Time to step down the Mahavikas aghadi What happens next to see Dr Bhamres sharp criticism

ज्यांनी हिंदुत्वाची गद्दारी केली त्यांना त्यांचे फळ मिळाले आहे. त्यामुळे हे बिघाडीचे सरकार बरखास्त होणार ही काळ्या दगडावरील रेख असल्याचे ते म्हणाले. पुढील दोन दिवसात आपण सर्वच बदल बघणार असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले.

    धुळे  : तिघाडी सरकारला जनता कंटाळलेली आहे. जनतेला आता बदल, परिवर्तन हवे आहे. त्याचे उदाहरण या विधानपरिषद निवडणूकीत दिसून आले. त्यात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे, आघाडीत बिघाडी झाली असून या सरकारला आता पायउतार होण्याची वेळ आली, असे म्हणत आगे.. आगे देखों होता है क्या, अशी प्रतिक्रिया खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. subhash Bhamre) यांनी दिली.

    राज्यात विधानपरिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही आमदार निवडणूक आल्याबद्दल धुळे महानगर भाजपातर्फे आज गुरूशिष्य स्मारकाजवळ जल्लोष करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून व फटाके फोडून, आनंद साजरा करण्यात आला. यावेळी खा. डॉ. भामरे (Dr. Bhamre) म्हणाले की, माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीसयांच्या नेवृत्वाखाली विधानपरिषद निवडणूकीत भाजपाने(BJP) मोठे यश मिळविले. राज्यसभेची निवडणूक असो अथवा विधानपरिषदेची जनता भाजपाच्या मागे हे दाखवून दिले. गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या घटनांमुळे राज्यातील आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. जनतेला बदल, परिवर्तन आणि लोककल्याणकारी राज्य हवे आहे. आघाडी सरकारला त्यांचे आमदाराच नाही तर जनताही कंटाळली आहे. म्हणून त्यांना पायउतार होण्याची वेळ आली आहे.

    ज्यांनी हिंदुत्वाची गद्दारी केली त्यांना त्यांचे फळ मिळाले आहे. त्यामुळे हे बिघाडीचे सरकार बरखास्त होणार ही काळ्या दगडावरील रेख असल्याचे ते म्हणाले. पुढील दोन दिवसात आपण सर्वच बदल बघणार असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले. यावेळी माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर अनिल नागमोते, नगरसेवक हिरामण गवळी, अमोल मासुळे, विजय पाच्छापुरकर, चंद्रकांत गुजराथी, यशवंत येवलेकर, जयश्री अहिरराव, मंगला कवडीवाले, सुनिता सोनार, मायादेवी परदेशी, युवराज पाटील, हिरू चौधरी, अनिल थोरात, विजय पवार, सागर कोडगीर, पवन जाजु, सनी चौधरी, बबन चौधरी, अजय अग्रवाल, प्रदीप पानपाटील, सुनिल बैंसाणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.