डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम कोणी अडवून ठेवलं हे वेळ आल्यावर दाखवून देईल – आमदार गणपत गायकवाड

संविधान दिनानिमित्त कल्याणपूर्वेत संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते

    कल्याण : बाबासाहेबांचा स्मारकाचे काम कोणी अडकवून ठेवलं हे वेळ आल्यास मी दाखवून देणार असे विधान कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय त्यांनी परत एकदा नाव न घेता शिवसेना नेत्यांना लक्ष केले आहे.

    संविधान दिनानिमित्त कल्याणपूर्वेत संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते यावेळी त्यांनी ड प्रभाग कार्यालय लगेच उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला लक्ष केलं. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कल्याण पश्चिमला जायचो, २००९ मध्ये आमदार झालो, त्यानंतर कल्याण पूर्वेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे स्वप्न पाहिले, कोंबडा कुठून ही आरवो पण सकाळ झाली पाहिजे, ती सकाळ आता होतेय, ज्यांनी सकाळ आणली त्यांचं अभिनंदन करतो पण या ठिकाणी या जागेपासून बाकी सर्व गोष्टीचं मी काम केलं, काही लोक बोलतात आमदाराने हे स्मारकाचं काम अडवून ठेवलं तेव्हा मला खूप खंत वाटते त्या गोष्टीचे खूप वाईट वाटतं. मात्र ज्यांनी हे अडकवून ठेवलं ते वेळ आल्यावर मी दाखवून देईल की कोणी अडकून ठेवलं होतं असा इशारा दिला.