Tiroda police arrested the thief in just three hours with fast action

शालू राहूल नागदेवे ही घराचे मागचे दार बंद करून सकाळी ७.३० वाजता घराजवळ बोअरवेलमधून पाणी आणण्याकरिता गेली होती. पाणी घेऊन आल्यानंतर तिला घराचे मागील दार उघडे असल्याचे दिसून आले. तसेच, लोखंडी अलमारीतील स्टीलचा दागिन्याचा डब्यात दागिने नव्हते. यावरून तिने दुपारी २ वाजता तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन तासातच छडा लावत आरोपी विक्की यास ताब्यात घेतले.

    चिखली : शुक्रवार २० मे रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान तिरोडा येथील गौतम बुद्ध वार्डातील एका घरातून अज्ञात चोरट्याने ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दरम्यान फिर्यादी महिलेने तक्रार देताच केवळ तीन तासात तिरोडा पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीस अटक केली. विक्की ताराचंद बनसोड (वय ३४, रा. नयापारा जि. महा समुंदर छ.ग., ह.मु. गौतम बुद्ध वार्ड तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे.

    तिरोडा येथील गौतम बुद्ध वार्डातील शालू राहूल नागदेवे ही आपले घराचे मागचे दार बंद करून सकाळी ७.३० वाजता घराजवळचे बोअरवेलमधून पाणी आणण्याकरिता गेली होती. पाणी घेऊन आल्यानंतर तिला तिचे घराचे मागील दार उघडे असल्याचे दिसून आले. तसेच, लोखंडी अलमारीतील स्टीलचा दागिन्याचा डब्यात दागिने नव्हते. यावरून तिने दुपारी २ वाजता तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन तासातच छडा लावत आरोपी विक्की यास ताब्यात घेतले.

    दरम्यान, त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला सायकाळी ५ वाजता अटक करून त्याने चोरी केलेले दागिने जप्त केले. तिरोडा पोलिसांनी या चोरीचा पर्दाफाश केवळ तीन तासात उघड केल्याने या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात हवालदार नितेश बावणे, शिपाई ज्ञानोबा श्रीरामे व चालक प्रशांत कहालकर यांनी केली.