ऊस उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणार : कोरे

आडसाली ऊसाऐवजी एक वर्षाची सुधारित जाती यशस्वी करून एकरी १५० टनापर्यंत ऊस उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करत कारखाना कार्यक्षेत्रातच ४० हजार एकरापर्यंतची निर्मिती करण्यासाठी ऊसविकास कार्यक्रमावर भर देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Dr.Vinay Kore) यांनी सांगितले.

    वारणानगर : आडसाली ऊसाऐवजी एक वर्षाची सुधारित जाती यशस्वी करून एकरी १५० टनापर्यंत ऊस उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करत कारखाना कार्यक्षेत्रातच ४० हजार एकरापर्यंतची निर्मिती करण्यासाठी ऊसविकास कार्यक्रमावर भर देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Dr.Vinay Kore) यांनी सांगितले.

    येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना संचलित आणि सावित्री महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या वारणा नर्सरी विभागाकडे सुधारित जातीच्या ऊस रोपांचा विक्री शुभारंभप्रसंगी डॉ. कोरे बोलताना म्हणाले की, गाळपासाठी लागणाऱ्या उसाच्या कमतरतेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ऊस विकास कार्यक्रमावर भर दिला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून वारणा नर्सरी येथे विविध प्रकारच्या सुधारित ऊसाच्या जाती निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

    ऊस रोपांच्या विक्रीबरोबरच ऊसाची लागण सुद्धा करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे सांगत उसाबरोबरच फळे, फुले, भाजीपाला वनौषधी यासारख्या रोपांची निर्मितीसुद्धा या नर्सरीच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सांगितले.