‘दंगल घडवून आणली म्हणणाऱ्या संजय राऊतांना…,’ संजय शिरसाट यांचा शेलक्या शब्दात पलटवार

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) दंगल घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला. याला संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

मुंबई– छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) राम नवमीच्या (Ram Navami) पूर्वसंध्येला दोन गटात हाणामारी झाली. पुढे या हाणामारीचे रुपांतर दोन गटात झाले. तसेच या दंगलीला धार्मिक रंग देण्यात आला आहे. याचे पडसाद मुंबईतील मालवणीमध्ये देखील उमटले. दोन गटात हाणामारी झाल्याने पोलिसांनी वेळीच दोन गटांना पांगवत दंगलीवर नियंत्रण आणले. यानंतर यातील वीस ते पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, यावर आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) दंगल घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला. याला संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणजे…

दरम्यान, संभाजीनगरमध्ये दंगल घडवून आणली असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे, असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारला असता, राऊत म्हणजे मूर्ख माणूस आहे…. असं शेलक्या शब्दांत शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. तसेच मविआची संभाजीनगरमधील सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. फक्त डायलॉगबाजी होईल, ऐकमेकांवर डोळे मारतील, यांना सामान्य माणसाचं, शेतकरी, कष्टकऱ्यांचे काहीही पडलं नाही. फक्त मविआची सभा म्हणजे कॉमेडी शो असल्याची टिका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

दंगल घडवून आणली…

आमची म्हणजे महाविकास आघाडीची दोन एप्रिलला (रविवारी) सभा होत आहे. ही सभा होऊ नये, सभेला परवानगी मिळू नये, यासाठी दंगल घडवून आणली असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी शिंदे सरकारवर केला आहे. दंगलीमुळं वातावरण तणावपूर्ण आहे, कायदा व सुव्यवस्थेचं कारण सांगून सभेला परवानगी द्याची नाही. म्हणून ही दंगल घडवून आणली. काल मुंबईत देखील मालवणीत दंगल झाली, पण आमची संभाजीनगरमध्ये शंभर टक्के सभा होणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

परवानगी दिली नसती तरी…

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, देशात लोकशाही आहे, सभेला परवानगी देणं हे पोलिसांचे व सरकारचं काम आहे, कोणीही सभा घेऊ शकते. पण तिथे तणावपूर्ण वातावरण आहे. जरी सभेला परवानगी दिली नसती तरी, विरोधकांनी परवानगी मिळाली नाही म्हणून आम्हाला दोष दिला असता, पण सभा कसा होणार याकडे पोलिसांचे लक्ष असेल, असं शिरसाट म्हणाले.

सरकार पुरस्कृत दंगलीतून तेढ निर्माण करायचे

मविआची सभा होणार आहे, सरकारमध्ये गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व दिसत नाही. गृहमंत्री केवळ विरोधकांवर खोटे गुन्हे दखल करण्याचे आदेश देतात. असं कधी झालं नव्हत, जर उलटं झालं तर आम्ही सत्तेत आलो तर, याची उत्तर द्यावी लागतील, खासकरुन पोलिसांना उत्तरं द्यावी लागलती. कुठे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री दिसतात का? संपूर्ण देशात दंगली घडविण्याचे काम भाजपाच्या सरकारमध्ये होत आहे. आमचे देखील सरकार होते. तेव्हा सगळे सुरुळीत सुरु होते. भाजपच्या सरकारमध्येच दंगली कशा होतात, समाजात तेढ निर्माण केले जात आहे. महाराष्ट्रात त्यांना शांतता नको आहे, ह्या दंगली सरकार पुरस्कृत असल्याचा घणाघात राऊतांनी राज्य सरकारवर केला.