
येत्या दहा वर्षात गॅस सिलेंडर १२० रुपयांनी तर ७० पैसे प्रति किलोमीटरणे गाडी धावेल. बायो फुइल व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमा अंतर्गत हा बदल होणे शक्य आहे.
बावधन : येत्या दहा वर्षात गॅस सिलेंडर १२० रुपयांनी तर ७० पैसे प्रति किलोमीटरणे गाडी धावेल. बायो फुइल व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमा अंतर्गत हा बदल होणे शक्य आहे. म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा व विधानसभा व स्थानिक निवडणुकीतून जनतेने करावे, असे उद्गार भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
भाजप पक्षाच्या मेरी माटी मेरा देश कार्यक्रमा अंतर्गत बावधन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, मान खटाव तालुक्याचे आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आ. मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अमर साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, सातारा जिल्हा प्रभारी अतुल भोसले, सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, वाई तालुका अध्यक्ष रोहिदास पिसाळ, विजयाभोसले, दीपक ननावरे, मनीषा घैसास, चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे पुढे म्हणाले, गेल्या ९ वर्षात भाजपने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृह मंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विकासाचा झंजावत सूरु असून सामान्य जनतेच्या हितासाठी. राबविलेल्या आहेत. तसेच देशातील महिलांना संसधेत प्रतिनिधित्व करता यावे यासाठी ३३% आरक्षण देऊन त्यांचा सन्माण केला आहे. त्यामुळे १९१ महिलांना खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तर् १०० महिला आमदार म्हुणुन निवडून येणार आहेत. जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव उज्वल केले आहेच.जगातील १९८ देशापैकी १५० देशांनी मोदींचे खणखर नेतृत्व मान्य केले आहे. १४ देशांनी आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन मोदींना सन्मानित केले आहे. तसेच ७८ % भारतीय हे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पसंदी देतात. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी डॉ. सुरभी भोसले, माजी आ. मदन भोसले, दीपक ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारभी बावधनकरांनी ‘जेसीबी’च्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून भला ‘मोठा हार’ घालून बावनकुळे व सहकाऱ्यांचे जल्लोष्यात स्वागत केले. तदनंतर बावधन येथील छ. शिवाजी महाराजच्या प्रतिमेस आ. बावनकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. तसेच सजविलेल्या बैलगाडीतून मान्यवरांची मिरवणूक काढून श्री कालभैरवनाथ दर्शन घेऊन अमृतवाटिकेसाठी तयार करण्यात आलेल्या अमृत कलशात बावधन परिसरातील शूरवीरांच्या घरातून माती एकत्रित केली. तर नंतर बावधन ग्रामस्थांच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाई तालुक्यातील जांब येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदधिकारी, ग्रामस्थांनी भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
दीपक ननावरे यांनी नेहमीच्या तडाकेबाज शैलीत प्रास्ताविक केले.बावधन गट भाजपच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास बावधन व वाई तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, ग्रामस्थ कात्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.