“महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा…”, असं का? व कुणाला म्हणाले प्रकाश आंबेडकर? वाचा…

प्रकाश आंबेडकरांच्या या धक्कादायक वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचितचा अजून मविआमध्ये समावेश नाही. मात्र ठाकरे गट व वंचितने युती केली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र कार्यक्रमात दिसताहेत.

    मुंबई– राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले आहे. शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एकिकडे शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची लढाईचा कौल देखील न्यायालयाने शिंदेंच्या पारड्यात टाकला आहे. मात्र या दोन्ही गटातील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरुच असताना, आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.

    नादी लागू नका, अन्यथा तुमचा बळी…

    दरम्यान, काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, सध्या काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. पक्षाला अध्यक्ष किंवा वरिष्ठांमध्येच एकता नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. हा पक्ष घराणेशाहीमध्ये अडकला आहे. हे असं असताना, महाविकास आघाडीच्या नादी लागू नका अन्यथा तुमचा बळी जाईल, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला आहे.

    आंबेडकरांचा सल्ला उद्धव ठाकरेंना…

    प्रकाश आंबेडकरांच्या या धक्कादायक वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचितचा अजून मविआमध्ये समावेश नाही. मात्र ठाकरे गट व वंचितने युती केली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र कार्यक्रमात दिसताहेत. पण आता प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला आहे. मविआत काँग्रेस व राष्ट्रवादीच्यात “तुमचा बळी जाऊ देऊ नका”, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यामुळं यावर आता ठाकरे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.