आज देवरांचा शिवसेनेत प्रवेश झाला, पुढे अजूनही मोठे भूकंप होतील ; मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान

कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) मध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी देवरा यांनी हे क्षण भावूक असल्याचे देखील सांगितले. तसेच कधी कॉंग्रेस सोडेल असा विचार देखील केला नव्हता याची देखील कबुली दिली. दरम्यान त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.

    काय म्हणाले गिरीश महाजन?

    मी तुम्हाला बोललो होतो की राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.आज मिलिंद देवरा यांचा प्रवेश झाला, पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असे देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.