उद्या सूप वाजणार! आज अंतिम आठवडा प्रस्तावात महापुरुषांच्या अवमानावरून विरोधक आक्रमक; तर विदर्भ, मराठवाडाच्या प्रश्नांवर चर्चा करणार – अजित पवार

आज विधिमंडळात विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल. या प्रस्तावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्र्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यावर सरकारला जाब विचारला जाईल. तसेच, 12-13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत चर्चा केली जाईल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

    नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे तर, उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं उद्या सूप वाजणार आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक हो, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज देखील विरोधकांनी मंत्र्यांचे राजीनाम्यावरुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

    दरम्यान, आज विधिमंडळात विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल. या प्रस्तावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्र्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यावर सरकारला जाब विचारला जाईल. तसेच, 12-13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत चर्चा केली जाईल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. दरम्यान, कोरोनानंतर नागपुरात तीन वर्षानंतर अधिवेशन होत आहे, 3 आठवड्यांचे अधिवेशन चालले असते तर, विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली असती,  विदर्भ, मराठवाड्याच्या मुद्द्यांना न्याय देता आला असता, असं पवार म्हणाले.

    दरम्यान, आज देखील विरोधकांनी मंत्र्यांचे राजीनाम्यावरुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच मंत्र्य़ांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे उत्तर दिले आहे, ते अजिबात समाधानकारक नाही. सरकारने थातुरमातून उत्तर देऊन वेळ काढू नये. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांतही वाढ झाली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, बावनकुळेंनी दिलेल्या इशारानंतर मला रात्रभर झोप लागली नाही, असं मिश्किलपणे म्हटले. तेव्हा सर्वांनाचा अजित पवारांनी हसायाला भाग पाडले.