
सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटका बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान समान अधिकार मिळत नाही, तोयपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असं बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. दरम्यान, आज संपाचा सहावा दिवस आहे. मुंबईची (Mumbai) दुसरी लाईफ लाईन समजली जाणारी बेस्ट बस (Best Bus) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे (BEST Workers Strike) हत्यार उपसले आहे. मागील सहा दिवसांपासून हा संप सुरु आहे. सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटका बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान समान अधिकार मिळत नाही, तोयपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असं बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होतायेत. (today is the six day of best strike the plight of mumbaikars due to the strike of contract employees of best what are the demands)
किती कर्मचारी संपात सहभागी?
दरम्यान, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने मुंबईकरांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बेस्ट प्रशासन आता बेस्टच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढवत असल्याचे दिसत आहे. आझाद मैदानात (Azad Maidan) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 तारखेपासून अनेक कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. जवळपास 9 कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे. या संपामुळं मुंबईकरांचे मोठे हाल होताहेत.
कर्मचारी मागण्यांवर ठाम…
सध्या आझाद मैदान येथे 9 हजार कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळं आझाद मैदानातील संपची दाखल शासनाने घेतली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन व मुंबई महानगरपालिका (बेस्ट) उपक्रम मधील कंत्राटी कामगार त्यांच्या काही मागण्यांसाठी आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करत आहेत. मागील आठवड्यात याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित दखल घेऊन त्यांच्या तर्फे शिवसेना सचिव व प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष या नात्याने किरण पावसकर यांना प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगून त्यांच्या समस्या व मागण्या समजावून घेतल्या. व यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदनातून योग्य तो तोडगा काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासित केले.