शिवसेनेची आजची सभा वादळी ठरणार! पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर साधणार निशाणा, सभेपूर्वी शिवसेना नेत्यांची बैठक

मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, आपण 14 तारखेच्या सभेच अनेकांचे मास्क काढणार आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना एका प्रकारे इशारा दिला होता. त्यामुळं मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सभेपूर्वीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

    मुंबईः राज्यात मागील काही दिवसांपासून अजान, भोंगे, मशिद, हनुमान चालीस, आरती यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हनुमान चालीसा व भोंग्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला व खासकरुन मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, आपण 14 तारखेच्या सभेच अनेकांचे मास्क काढणार आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना एका प्रकारे इशारा दिला होता. त्यामुळं मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सभेपूर्वीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

    राणा दाम्पंत्य, मनसे व भाजपाचा मुख्यमंत्री समाचार घेणार?
    राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, भाजप ही हा मुद्दा उचलून धरत ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर राणा दाम्पंत्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांचा वर्षा या घरासमोर येऊन हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले होते, त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेवर ताण आला होता. तसेच भाजपाचे किरिट सोमय्या हे वारंवार घोटाळेबाज सरकार म्हणून टिका करत आहेत. या सर्वांचा या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समाचार घेणार असून, यांना जशाच तसे उत्तर देणार का हे आजच्या सभेतून पाहावे लागेल.

    दरम्यान, दरम्यान सभेपूर्वीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. संजय राऊतांनी आज सकाळीच एक शायरी ट्वीट केली आहे. ‘लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कुछ लोग भूल गये है अंदाज हमारा!’, अशी शायरी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच, शायरीच्या शेवटी जय महाराष्ट्र असंही म्हटलं आहे. तसेच सभेपूर्वी आज शिवसेना भवन येथे शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत सभेची रणनीती ठरवण्यात आल्याचं कळते. त्यामुळं शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दावर कोणती भूमिका घेते तसेच विरोधकांवर मुख्यमंत्री निशाण साधतील असे संकेत राऊतांनी दिले आहेत, त्यामुळं आजची शिवसेनेची सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.