शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रात ‘विषारी झाडाचे फळ’ असा ‘या’ नेत्याचा केला उल्लेख

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार हे ‘विषारी झाडाचे फळ’ असल्याचे म्हटले आहे. फ्लोअर टेस्ट आणि नवीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची नियुक्ती यासह सर्व घटना 'विषारी झाडाची फळे' आहेत. असा घणाघाती वार प्रतिज्ञापत्रतून करण्यात आला आहे.

    मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर त्यांनी शिंदे गट स्थापन करत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पदभार स्विकारला तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी जबाबदारी घेतली. मात्र शिंदे गटातील सोळा अपत्रा आमदार, पक्षाचे चिन्ह तसेच शिवसेनेवर (Shivsena) दावा करणाऱ्या शिंदे गटाविरोधात शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होती. दरम्यान, यावर पुन्हा उद्या सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, शिंदे गटाने (Shinde Group) उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाबाबत चुकीचे विधान केले. पक्षविरोधी कारवाया लपवण्यासाठी बंडखोर आमदारांनी ‘खरी सेना’ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तसेच बंडाळी आमदारांनी घटनात्मक पाप केले आहे. असं ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

    दरम्यान, प्रतिज्ञापत्र शिंदे गटावर बोचरी टिका तसेच शिंदे गटाला हुसकविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार हे ‘विषारी झाडाचे फळ’ असल्याचे म्हटले आहे. फ्लोअर टेस्ट आणि नवीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची नियुक्ती यासह सर्व घटना ‘विषारी झाडाची फळे’ आहेत. असा घणाघाती वार प्रतिज्ञापत्रतून करण्यात आला आहे, त्यामुळं याला आता शिंदे गटाकडून कसे प्रतिउत्तर येते हे पाहावे लागेल.