आज शिवसेनेचा दसरा मेळावा? उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

मागील काही दिवसांपासून राज्यात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे, शिवसेनेवरुन भाजप तसेच शिंदे गटाकडून टिका केली जात आहे. या सर्व पाशर्वभूमीवर आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे गटप्रमुखांना (Gatpramukh) सांयकाळी सात वाजत संबोधित करणार आहेत. गटप्रमुखांना गोरेगावमधील नेस्को संकुलात मेळावा होणार आहे.

    मुंबई : राज्यात चार महिन्यापूर्वी सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिवसेनेला गळती लागली असून, पदाधिकारी, नगरसेवक तसेच खासदारांनी (corporators and MP) सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर शिंदे गट व शिवसेना (Shivsena and shinde group) अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान आता शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावरुन सुद्धा शिंदे गट व शिवसेनेत तू….तू, मै…मै चालले आहे, तसेच हा प्रश्न कोर्टापर्यंत पोहचला आहे, त्यामुळं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव कोण घेणार? याची उत्सुकता असताना, आज दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना एका मोठा मेळावा घेणार आहे.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे, शिवसेनेवरुन भाजप तसेच शिंदे गटाकडून टिका केली जात आहे. या सर्व पाशर्वभूमीवर आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे गटप्रमुखांना (Gatpramukh) सांयकाळी सात वाजत संबोधित करणार आहेत. गटप्रमुखांना गोरेगावमधील नेस्को संकुलात मेळावा होणार आहे, यावेळी उद्धव ठाकरे हे भाजप, शिंदे गट, मोदी-शहा यांचा समाचार घेणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच दसरा मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याआधीच आज शिवसेनेची तोफ धडाडणार आहे.