आज शहरातील पाणीपुरवठा बंद; जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार

वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

    पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा बहुतांश भाग, चतुश्रुंगी, हडपसर, मुंढवा, बालाजीनगर, इंदिरानगर या परिसराचा पाणीपुरवठा आज (गुरुवारी) बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

    पाणीपुरवठा बंद असलेला परिसर :

    वारजे जलशुद्धिकरण केंद्र – वैदुवाडी, मॅफको, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा, चतुश्रुंगी परिसर, पत्रकारनगर, एलआयजी, एमआयजी, एचआयजी, नीलज्योती, म्हाडा, गोखलेनगर, कुसाळकर पुतळा, जनवाडी, पीएमसी कॉलनी, लालचाळ, हिरवीचाळ, भोसलेनगर, खरेवाडी, सिंचननगर, आयसीएस कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, बीएमसीसी रस्ता, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड, वडारवाडी, दीप बंगला चौक परिसर, मॉडर्न कॉलेज परिसर, घोले रस्ता, गोखले (एफसी) रस्ता, शिरोळे रस्ता, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, शिवाजीनगर पोलिस लाइन, रेव्हेन्यू कॉलनी, विश्रामबाग सोसा, रामोशीवाडी, मंगलवाडी, हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ. रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसा, मोरे विद्यालय, हनुमाननगर, केळेवाडी, एमआयटी कॉलेज रस्ता डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा, यशश्री सोसा, सिग्मा वन, कानिफनाथ, एलआयसी कॉलनी, माधवबाग, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थनगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, पेठकर साम्राज्य, कांचनबाग, लीलापार्क, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझादनगर, वनाज कंपनी संपूर्ण परिसर, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी.