आज उद्धव ठाकरेंची तोफ मालेगावमध्ये धडाडणार, कोणावर निशाणा साधणार? राज ठाकरेंना उत्तर देणार?

या सभेचा दोन दिवसांपूर्वी टिझर लॉँन्च करण्यात आला होता, या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दोनच गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी जोरदार टिका उद्धव ठाकरेंवर केली होती, त्याला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

मालेगव-  आज मालेगामध्ये (Malegaon) ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सभा घेणार आहेत. एकिकडे पक्ष व चिन्ह यांचा निकाल न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे. तर सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, आता शिंदे गटाने खेडमध्ये जोरदार सभा घेतल्यानंतर आता ठाकरे गटाकडून आज रविवार (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार असून, या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेचा दोन दिवसांपूर्वी टिझर लॉँन्च करण्यात आला होता, या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दोनच गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी जोरदार टिका उद्धव ठाकरेंवर केली होती, त्याला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरेंच्या आरोपाना उत्तर देणार?

दरम्यान, गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण शिवसेना का सोडली, शिवसेना सोडायाला मला भाग पाडले. याला सर्वंस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर काही गंभीर आरोप केलेत. या आरोपाना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? किंवा आणखी कोणाचा समाचार घेणार? कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काय म्हटलंय टिझरमध्ये?

खेडमध्ये ठाकरे गटाची सभा झाल्यानंतर याला उत्तर म्हणून शिंदे गटाने खेडमध्ये सभा घेत, शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून आज (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी मालेगावमध्ये आलेत. दरम्यान, या सभेचा टिझर लॉँन्च करण्यात आला आहे. “बरं झालं गद्दार गेले…, असं उद्धव ठाकरेंच्या आवाजात म्हणण्यात आलं आहे”. या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

संजय राऊत मालेगावमध्ये…

ठाकरे गटाची आज (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये आलेत. या सभेची कशाप्रकारे तयारी सुरु आहे, याचा आढावा संजय राऊतांनी घेतला आहे. दरम्यान, या सभेचा टिझर लॉँन्च करण्यात आला आहे. यावरुन ठाकरे गटाने शिंदे गटावर टिका केली आहे.