आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी लालबागच्या राजाचे दर्शन घेणार; कसा असणार अमित शहांचा दौरा?

लालबागच्या राजाजवळ नवस मागितला किंवा मनातील इच्छा व्यक्त केली की, राजा नवसाला पावतो. अशी ओळख लालबागच्या राजाची आहे. याच राजाच्या दर्शनासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी मुंबईत येणार आहेत.

    मुंबई – चौदा विद्या आणि चौष्ठ कलांची देवता म्हणजे गणपती बाप्पा. (Ganesh Ustav) या बाप्पाची गणेशभक्त वर्षभर वाट पाहत असतात. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने वातावरणात भक्तीमय तसेच प्रसन्नता असते. मंगळवारी गणरायाचे आगमन झाले आहे. दरम्यान, आपला लाडका बाप्पा गणपतीचे आगमन होऊन पाच दिवस होऊन गेले आहेत. त्यामुळं आज कित्येक घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील अनेक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्राचा लाडका बाप्पा व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक देशभरातून येत आहेत. राज्यासह देश-विदेशात लालबागच्या राजाची प्रसिद्धधि व ख्याती आहे. लालबागच्या राजाजवळ नवस मागितला किंवा मनातील इच्छा व्यक्त केली की, राजा नवसाला पावतो. अशी ओळख लालबागच्या राजाची आहे. याच राजाच्या दर्शनासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी मुंबईत येणार आहेत. (Today Union Home Minister Amit Shah will have darshan of Raja of Lalbagh in the afternoon; How will Amit Shah’s tour be)

    कडेकोट सुरक्षा…

    दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असल्यामुळं परिसरात कडेकोट पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. अमित शहा दुपारी 3 वाजता लालबागच्या दर्शन घेणार आहेत, यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत. तसंच यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरीही गणपती दर्शनाला जाणार आहेत.

    कसा असणार शहांचा दौरा?

    दुपारी ०२.४० वा.केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन

    दुपारी ०३.०० वा. सार्वजनिक गणेशोत्सव पंडाल, बांद्रा (प.), मुंबई येथे गणेश दर्शनासाठी जाणार

    दुपारी ०३.५० वा. लालबागचा राजा  येथे गणेश दर्शनासाठी जाणार

    सायंकाळी ०४.३५ वा. वर्षा निवासस्थान केंद्रीय गृह मंत्री यांचे गणेश दर्शनासाठी

    सायं. ०६.०० वा. मुंबई विद्यापीठ व सहकार भारती द्वारा आयोजित मा. लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमास उपस्थिती.

    यानंतर दिल्लीला रवाना…