आजचा भाजप बदलला आहे, आजचा भाजप सर्व जाती धर्माचा पक्ष आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ताबा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली.

  मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं, बीजेपी सोबत असलो तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अशी युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आलं पाहिजे. इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते भारत जोडो यात्रा काढत भारत तोडते आहोत. भाजपामध्ये परिवर्तन झालं आत्ताचा भाजप बदललाय, भाजप हा सर्व जाती धर्मपंथांचा पक्ष आहे, संविधान बदलते ही अफवा आहे असं रामदास आठवले यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास देखील बोलून दाखवला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले डोंबिवलीत आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेसाठी आले होते.

  बच्चू कडू यांची समजूत काढू – रामदास आठवले
  नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात शड्डू ठोकला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी अनेक या आधीचे विषय मिटवले आहेत. विषय मिटवावा मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी बोलणार आहे त्यांचे नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

  वंचितचा निर्णयाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून समर्थन
  वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मधून जवळपास बाहेर पडल्याच निश्चित झालं आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचा हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले. वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरेदी यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे तो निर्णय स्वबळावर लढण्याचा घेण्यात आला आहे. तो योग्य निर्णय आहे दुसरा इलाज नाही. महाविकास आघाडी यांना विकास करता आला नाही. गेल्या दहा वर्षात बदल जाणवतोय देशावर नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे असे सांगितले

  आरपीआय महायुतीत आहे जागेची अडचण होती. शिर्डीसाठी माझा आग्रह होता मात्र शिर्डीची जागा सोडता आली नाही पण बाकीच्या जी काही आश्वासन दिले ते आश्वासन ते पाळतील असे आम्हाला आशा आहे. मनसे काय अद्याप महायुतीमध्ये आलेले नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही.

  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ताबा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. मात्र एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी 2006 ला माझी राज्यसभा संपते ते कंटिन्यू करण्याचा आश्वासन दिले. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळ होणाऱ्या विस्तारात देखील आरपीआयला जागा दिली जाईल असे देखील आश्वासन दिल्याचं आठवले यांनी स्पष्ट केले.

  महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये आरपीआयचा झेंडा दिसत नाही याबद्दल थोडी नाराजी होती. मात्र येथून पुढे आरपीआयला सन्मान दिला जाईल असा आश्वासन फडणवीस यांनी दिलं. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारकांचे काम त्याचप्रमाणे इंदूमिल येथील स्मारकाचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी बोलून दाखवला तसेच संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधानाला अजिबात हात लावू देणार नाही माझ्या पक्षाचे असल्याचे आठवले यांनी सांगितले. डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.