राज्य मंत्रीमंडळाची आज होणारी बैठक रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली. टास्क फोर्ससोबतच्या आजच्या बैठकीत करोना निर्बंध आणखी कठोर करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज तज्ज्ञांशी चर्चा करुन मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना निर्बंध कठोर करण्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता आहे.

    राज्य मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या आढावा दौऱ्यामुळे मंत्रिमंडळाची या आठवड्यातील बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत वाढते कोरोना संक्रमण, ओबीसी आरक्षणांसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यात होती. मात्र पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे या आठवड्यातील बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    राज्यावर ओमायक्रॉनचे मोठे संकट असून सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना ते घराबाहेर न करता घरीच साधेपणाने साजरे करा, अशी सूचना राज्याच्या गृह विभागाने बुधवारी नागरिकांना केली. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मिरवणुका काढू नयेत, फटाक्यांची आतषबाजीही करू नये, असेही निर्देश आहेत. २५ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू आहे. खुल्या जागेवरील कार्यक्रम २५%, तर बंदिस्त जागेवरील कार्यक्रम ५०% क्षमतेत घेण्याचे निर्बंध आहेत. तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाकरे हे बुधवारी सकाळी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाले. महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांची या बैठकीस उपस्थिती होती.

    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली. टास्क फोर्ससोबतच्या आजच्या बैठकीत करोना निर्बंध आणखी कठोर करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज तज्ज्ञांशी चर्चा करुन मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना निर्बंध कठोर करण्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता आहे.