विधानसभेचे आज होणारे विशेष अधिवेशन राज्यपालांनी केले स्थगित

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याने मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याची गरजच उरलेली नाही. राज्याच्या राजकारणात मविआ सरकारचा असलेला अडसर आता दूर झाला असून भाजप राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

    मुंबई : गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर बुधवारी रात्री (२९ जून २२) रोजी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. या दिवसभरात घडलेल्या घटना- घडामोडी पाहता राज्यपालांनी आज विशेष अधिवेशन (Special Session) बोलविले होते पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (CM Uddhav Thackeray Resigns) दिल्याने हा प्रश्नच निकाली निघाला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याने मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याची गरजच उरलेली नाही. राज्याच्या राजकारणात मविआ सरकारचा असलेला अडसर आता दूर झाला असून भाजप राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी बोलविलेले हे विशेष अधिवेशन स्थगित करण्यात येत आहे.