दिलासा! टोमॅटोच्या किंमतीत निम्मी घट; आवक वाढल्यानं…, तर कांदा पुन्हा रडवणार?

मागील काही दिवसापासून टोमॅटोच्या (tomato) किंमती गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळं जेवणातील टोमॅटो गायब झाला होता. पाव किलो टोमॅटोसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत असे. पण आता टोमॅटोच्या किंमतीत पन्नास टक्के घट झाली आहे.

    नवी मुंबई – सर्वसामान्यांसाठी व ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून टोमॅटोच्या (tomato) किंमती गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळं जेवणातील टोमॅटो गायब झाला होता. पाव किलो टोमॅटोसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत असे. पण आता टोमॅटोच्या किंमतीत पन्नास टक्के घट झाली आहे. दरम्यान, टोमॅटोची आवक वाढल्यने  टोमॅटोच्या किंमतीत घट झाली आहे. नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने पंजाब, कर्नाटक राज्यांतून पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीत २० ते २५ हजार टोमॅटोचे क्रेट्स येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळं टोमॅटोच्य किंमतीत घट झाली आहे. (tomato price cut by half as the income increases will the onion cry again)

    टोमॅटो उत्पादकांच्या चिंतेत वाढ…

    दरम्यान, दोन दिवसांपासून टोमॅटोच्या किंमतीत घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटो १८० ते २०० रुपये किलो बाजारात विकला जात होता. पण मागील दोन दिवसांपासून आता टोमॅटो १०० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. टोमॅटोचे शुक्रवारी (ता. ११) ५० टक्क्यांहून अधिक दर घसरले. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेट्सला जास्तीत जास्त १०० रुपये, तर कमीत कमी २००, तर सरासरी ९०१ रुपयांपर्यंत दर खाली आले. आणखी दर घसरण्याच्या भीतीमुळे टोमॅटो उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    कांद्याच्या किंमतीती वाढ होण्याची शक्यता

    एकिकडे टोमॅटोच्या किंमतीत घट होत असताना, दुसरीकडे कांद्याच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. कांद्या पुन्हा डोळ्यात पाणी आणणार आहे. सध्या २५ ते ३० रुपये किलो कांदा विकला जात आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कांदाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.