Chief Minister Uddhav Thackeray's first blow

आता दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे.

    मुंबई – जणूकाही महाराष्ट्रात भंगार राज्य चाललंय असं सुरू आहे. आता दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

    आज मुंबईतील बीकेसी ( Uddhav Thackeray news mumbai bkc ) येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून ( CM Uddhav Thackeray on hindutva in mumbai ) भाजपला धारेवर धरले.