लोकसभेची रंगीत तालीम समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, उदया विजयी मिरवणूक काढणार, आमदार महादेवराव महाडिकांची प्रतिक्रिया

राजकीय वनवासात गेलेल्या महाडिक गटाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. तसेच त्यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले आहे. ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

    कोल्हापूर : शुक्रवारी राज्यसभा निवडणूक  (rajya sabha election result) झाली आणि त्याचा निकाल आज रात्री तीन वाजता लागला. राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ९ तासांच्या नाट्यमय घडामोंडीनंतर आज पहाटे तीन वाजत निकाला आहे. आणि शिवसेनेच संजय पवार यांनी हरवत भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. यानंतर पवार यांनी ३९ मते मिळाली तर, महाडिक यांना ४१ मते मिळाली. राज्यात सहा जागांपैकी तीन जागा भाजपाला मिळाल्यात तर, तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. दरम्यान निकालानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वनवासात गेलेल्या महाडिक गटाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. तसेच त्यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले आहे. ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

    उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने स्वागत होईल, याचे संकेत दिले. माझं नाव महादेव आहे असं ते म्हणाले की, जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. पण उद्या आम्ही धनंजय महाडिक यांची विजयी मिरवणूक कोल्हूपर जिल्ह्यात काढणार आहोत.