मलिक आणि देशमुखांच्या याचिकेवर उद्या सुनावणी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधान परिषदेत मतदान करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका नव्याने मलिक यांनी दाखल केली असून मलिक आणि देशमुखांच्या याचिकेवर बुधवारी एकत्रितरित्या सुनावणी पार पडणार आहे.

    मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधान परिषदेत मतदान करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका नव्याने मलिक यांनी दाखल केली असून मलिक आणि देशमुखांच्या याचिकेवर बुधवारी एकत्रितरित्या सुनावणी पार पडणार आहे.

    मनी लाँण्ड्रिग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात विधान परिषदेसाठी मतदान करण्याची मूभा देण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार केल्याप्रकऱणी अटकेत असलेले मलिक यांनाही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या याचिकेत दुरुस्ती करून विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मलिक यांच्यावतीने कऱण्यात आली. न्यायालयाने त्यांची मागणी अमान्य केली.

    दरम्यान त्यावर मलिक यांनी आधीची याचिका मागे घेत विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या परवानगीसाठी नव्याने याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर उद्या (बुधवारी) एकत्रितरित्या न्या. निजामुद्दीन जमादार यांच्यासमोर सुनावणी पार पडणार आहे.