टॉप्स सिक्युरीटी प्रकरण: एम. शशिधरन आणि अमित चांदोले यांचा अर्ज फेटाळला, दोषमुक्तीचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडून अमान्य

या कंत्राटात कोट्यवधी चा घोटाळा झाल्याच्या आरोप ठेऊन मनी लॉंड्रिंग (Money Laundering) कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम शशिधरन यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तर ईडीने आमदार सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयात धाडी टाकून कुटुंबियांची चौकशी यापूर्वीच केली आहे.

    मुंबई : सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या टॉप्स सिक्युरीटी (Tops Security, Security Gards Provider Company) नामक कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी (Financial Misappropriation Case) अटक करण्यात आलेले टॉप्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन (Managing Director M. Sasidharan) आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले (Amit Chandole is close to MLA Pratap Sarnaik) यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे (The Mumbai Sessions Court rejected the acquittal application).

    २०१४ साली एमएमआरडीएला ३५० ते ५०० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळाले. सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने केली.

    या कंत्राटात कोट्यवधी चा घोटाळा झाल्याच्या आरोप ठेऊन मनी लॉंड्रिंग (Money Laundering) कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम शशिधरन यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तर ईडीने आमदार सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयात धाडी टाकून कुटुंबियांची चौकशी यापूर्वीच केली आहे.

    सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीने अटक केली आहे. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात सी समरी रिपोर्ट स्वीकारला असून आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी शशिधरन आणि चांदोले या दोघांनी न्यायालयाकडे केली. तसेच त्यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने १४ सप्टेंबर रोजी सी समरी अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. मात्र, ९० दिवसाच्या आतच हा अर्ज दाखल झाल्याने न्यायालयाने दोघांचाही दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला.