सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक; कोल्हापुरात 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण, अन्यथा सरकारला…

सकल मराठा समाजाकडून अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई छत्रपती शिवाजी चौकात 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंती दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत. यामध्ये टप्याटप्याने यामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी होण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

    कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील १६ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे उपोषणला बसले आहेत. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. दरम्यान, काल मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी आज दुपारी उपोषण सोडण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. मात्र जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असताना, आता या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. आता कोल्हापुरात सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून, कोल्हापुरात 2 ऑक्टोबरपासून आमरण साखळी उपोषण करण्यात येणार आहे. (Total Maratha society aggressive for reservation; Fast to death in Kolhapur from October 2, otherwise the government)

    2 ऑक्टोबरपासून मराठा समाजाचा एल्गार

    दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, देशातील जातीनिहाय केलेल्या जनगणनेचा अहवाल जाहीर करा, अशा विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाकडून अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई छत्रपती शिवाजी चौकात 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंती दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत. यामध्ये टप्याटप्याने यामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी होण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

    आज बुलढाण्यात मोर्चा तर नगरमध्ये रास्ता रोको

    दरम्यान, जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. आज बुलढाण्यात मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात महाविद्यालयीन तरुण तरीण मार्गदर्शन आणि आपली भूमिका मांडत आहेत. तसेच अहमदनगरमध्ये रास्ता रोको करण्यात येत आहे. जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देण्यासाठी अहमदनगरमध्ये रास्ता रोको करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या वतीने नगर-पुणे रोडवर हे रास्तारोको करण्यात येत आहे.

    आज जरांगे पाटील उपोषण सोडणार?

    आपण मोठ्या ताकदीने आंदोलन उभं केलं आहे, त्याचं सोनं करायला हवं. त्यामुळे आपण हे आंदोलन सुरू ठेवायला हवं. तज्ज्ञ सांगतायत की उपोषण एक महिन्यासाठी मागे घ्या, सरकारला ३० दिवसांची मुदत द्या. ३१ व्या दिवशी आरक्षण मिळालं नाही तर मग उपोषणाला बसा. परंतु या ३० दिवसात आंदोलन सुरूच ठेवा. गावागावात आणि इथेसुद्धा (अंतरवाली सराटी) आंदोलन सुरूच ठेवा. जरांगे पाटील म्हणाले, आपण सरकारला ३० दिवसांची मुदत देऊ. परंतु आंदोलन सुरूच राहील. आपण हे आंदोलन कायमचं मागे घेतलं तर मग आपला अवतार संपला म्हणून समजा. आमरण उपोषण एक महिन्यासाठी मागे घ्या, असं सांगत आहेत. एक महिन्यात आरक्षण नाही दिलं तर ते (राज्य सरकार) तोंडावर पडतील. आणि सगळ्या मंत्र्यांना महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही. त्यामुळं आज जरांगे पाटील उपोषण सोडणार का, याकड सर्वाचे लक्ष लागले आहे.