mangalprabhat lodha and shreepad naik

पर्यटन(Tourism) वाढीसाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देणार असल्याचं वक्तव्य पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (mangalprabhat lodha) यांनी केलं आहे.

    मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करून पर्यटन (Tourism) वाढीसाठी शासनाचे धोरण नेहमीच लवचिक राहील. (Maharashtra News) या क्षेत्रातील प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेवून यावरती विचार करून निर्णय घेण्यात येईल.आपल्या सूचना नक्की सांगाव्यात असं वक्तव्य पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha) यांनी केलं आहे.

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी आज चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.

    पर्यटन वाढीसाठी पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करेल. तसेच आज राज्यात या क्षेत्रात येणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी धोरणे शासन अवंलबत आहे. चर्चेत सर्वांच्या अडचणी जाणून घेवून नक्कीच यावरती ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

    यावेळी उपस्थित पर्यटन भागधारक ऋषभ मेहरा,अभय घाणेकर,निशा शेट्टी,प्रशांत अंधाळकर,राकेश मोरे,राजेश गाडगीळ, राजेंद्र फडके, ऋषीकेश यादव,गौरंग नायक,व्यंकटेशन दत्तात्रयन,ग्यान भूषण,धर्मेद्र हॉलीडे ट्रीप्स,चंदन भडसावळे,लोकेश सावंत,रेखा चौधरी यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबींबाबत आपली मते व्यक्त केली.