Tourists experience thrill of seeing 528 animals in the moonlight of Buddha Pournima!

अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याने बुलढाणा शहराला वेढा घातलेला आहे. या अभयारण्यात विविध प्राणी व पक्षांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांची गणना करण्याचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेला आयोजित करण्यात आला होता.

    बुलढाणा : वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी गणना करण्यात येते. यंदा बुद्ध पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात ५२८ प्राणी आढळून आले आहे. उभारण्यात आलेल्या ४३ मचानवरून पर्यटकांनी प्राणीदर्शनाचा थरार अनुभवला. प्राण्यांची गणना कोरोनामुळे दोन वर्षानंतर झाली. उन्हाळ्यात दिवसभरातून किमान एकदा तरी वन्यजीव पाणवठय़ावर येतातच. काही निशाचर प्राणी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात ते सहज दिसू शकतात. त्यामुळे दरवर्षी बौद्ध पौर्णिमाला गणनेच्या वन्यजिवांची जंगलातील संख्या नोंदवण्यात येते.

    अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याने बुलढाणा शहराला वेढा घातलेला आहे. या अभयारण्यात विविध प्राणी व पक्षांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांची गणना करण्याचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेला आयोजित करण्यात आला होता. यासाठी वनविभागाने अभयारण्यात ४३ कृत्रिम पाणवठे तयार करून त्याच्या जवळ ४३ मचान उभारले होते. दरम्यान पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या ५२८ प्राण्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी दिली. पर्यटकांनी प्रतिसाद दिल्यामुळे वन्यजीव विभागाच्या महसुलामध्ये देखील भर पडला आहे.

    प्रजाती निहाय प्राणी संख्या

    बिबट १७, अस्वल २९, रानडुक्कर १७४, सायाळ ९, ससा ३३, भेडकी ७, नीलगाय ११४, मोर लांडोर ६६, चिंकारा २, रानमांजर ४, माकड ४२, काळवीट २, हरिण १७, खवल्या मांजर ५, मसण्याउद ६, लांडगा १