विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी

ॲकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे नेण्यात येत होते. मात्र, सटाणा-बागलाणच्या दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक पलटली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी काहींना सटाणा आणि काहींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    नाशिक : सटाणा-बागलाण तालुक्यातील दोधेश्वर ॲकॅडमीच्या (Dodheshwar Academy) प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला (Tractor) भीषण अपघात (Accident) झाला आहे. घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

    ॲकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे नेण्यात येत होते. मात्र, सटाणा-बागलाणच्या दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक पलटली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी काहींना सटाणा (Satana) आणि काहींना मालेगावच्या (Malegaon) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी श्रावणी सोमवारनिमित्त दोधेश्‍वरच्या शिवमंदिरात भरणाऱ्या यात्रेत बंदोबस्तासाठी गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. अपघातात निलेश वनोरे याचा मृत्यू झाला आहे.