शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे

बीडमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.बीडचे सुपुत्र असलेल्या विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहणी आणि शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी मेटे यांना श्रद्धांजली म्हणून आज दुकाने बंद ठेवण्याची विनंती व्यापाऱ्यांना केली होती.

    बीड – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना बीडमधील व्यापाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देत शहरात आज कडकडीत बंद पाळला आहे. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.बीडचे सुपुत्र असलेल्या विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहणी आणि शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी मेटे यांना श्रद्धांजली म्हणून आज दुकाने बंद ठेवण्याची विनंती व्यापाऱ्यांना केली होती. आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.

    दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बीड येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी अहमदनगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे पार्थिव ठेवण्यात आले आहे. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी नागिरक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत अत्यंतदर्शन घेता येईल, शिवसंग्रामच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. त्यानंतर अंत्यविधीला सुरुवात होईल. दुपारी साधारण साडे तीन वाजेच्या सुमारास बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या उत्तम नगर भागात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.