
दि वाई अर्बन को. ऑप बँकेने गेट पे कंपनीच्या माध्यमांतून बँकेच्या सेव्हिंग्ज, करंट व कॅश क्रेडीट खातेदारांसाठी सुरू केलेल्या क्यूआर कोड सुविधेचा बँकेच्या कार्यक्षेत्रांतील व्यापारी व व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले आहे.
वाई : दि वाई अर्बन को. ऑप बँकेने गेट पे कंपनीच्या माध्यमांतून बँकेच्या सेव्हिंग्ज, करंट व कॅश क्रेडीट खातेदारांसाठी सुरू केलेल्या क्यूआर कोड सुविधेचा बँकेच्या कार्यक्षेत्रांतील व्यापारी व व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले आहे.
येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात अनिल देव बोलत होते. अनिल देव म्हणाले, सर्व संचालक सदस्यांच्या सेवाभावी वृत्तीतून बँकेचे कामकाज सुरू आहे. सध्याच्या बदलत्या युगाबरोबरच व्यापारी, व्यावसायिकांना क्यूआर कोड ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेचे खातेदार व व्यापा-यांनी बँकेचे भागभांडवल खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, संचालक विवेक पटवर्धन आदींनी बँकेच्या क्यूआर कोड सुविधेबाबतची माहिती दिली. गेट पे कंपनीचे विपणन प्रतिनिधी राहूल दंडुके यांनी क्यूआर कोड ऍपची माहिती दिली. कंपनीने १०० हून अधिक बँकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये दिवसांतून चार वेळा फंड फिरविण्याची व्यवस्था आहे. ग्राहकाने कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच मोबाईलव्दारे सूचित करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे यासाठी अतिरिक्त साऊंड घ्यावा लागत नाही.
तसेच इतर कंपन्यांप्रमाणे जादाचे मासिक भाडे द्यावे लागत नाही. वाई व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन फरांदे, मिलिंद पाटणकर यांनी वाईतील अनेक व्यापारी क्यूआर कोडचा फायदा घेतील व बँकेचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले.