मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; पुण्यातील ‘या’ ठिकाणी होणार सभा

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २०) पुणे नगर रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराकडून पुणे नगर रोडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.

    पिंपरी : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २०) पुणे नगर रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराकडून पुणे नगर रोडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूकविभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहे.

    मनोज सारंगे पाटील यांच्या सभेसाठी सुमारे दीड ते दोन लाख मराठा समाज बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांची वाहने एकाच मार्गावर येणार आल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जड अवजड वाहनेवळविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पोलीस रुग्णवाहिका, अग्निशमन विभाग, पेट्रोल, डिझेल टॅंकर, पीएमपीएमएल बस, स्कूल बस यांना वगळण्यात आले आहे.

    पिंपरी चिंचवड शहराकडून पुणे नगर रोड कडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ही वाहने जुना पुणे मुंबई महामार्गावरून भक्ती शक्ती चौक-मोशी टोलनाका-चाकण शिक्रापूर मार्गे नगरकडे जातील. तसेच नाशिक फाटा भोसरी -चाकण मार्गे नगरकडे जातील.