मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतील बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक सुरळीत पार पडावी यासाठी छ. संभाजीनगर शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीत काही बदल केला आहे.

  छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक होणार असून मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी सिंचन, शेती आरोग्य, शिक्षण, दळणवळण, आणि उद्योगासाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजचे गिफ्ट मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

  दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आंदोलन आणि मोर्चे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक सुरळीत पार पडावी यासाठी छ. संभाजीनगर शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीत काही बदल केला आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडताना संभाजीनगरकरांनी काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो..

  हे रस्ते राहणार बंद :

  सकाळी 7 ते 10 पर्यंत शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक रस्ता बंद

  सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यत भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता पूर्णपणे बंद राहील.

  सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत गोपाळ टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक रस्ता बंद रहाणार.

  क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्व, पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद.

  सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला

  बाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेट रस्ता बंद.

  असा असणार वाहनांसाठी पर्यायी मार्ग

  संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून शंभूनगर, गादिया विहार ते शिवाजीनगरमार्गे वाहने जातील, येतील.

  शिवाजीनगर, बारावी योजना मार्ग, गोकूळ स्वीट, जयभवानी चौकमार्गे पुढे जातील व येतील.

  अण्णा भाऊ साठे चौक, टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल नाका, सेव्हन हिल्स, क्रांती चौक उड्डाणपुलावरून महावीर चौक, मिल कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.

  राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मिल कॉर्नरहून यूटर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टीमार्गे पुढे जातील व येतील.

  राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मिल कॉर्नरहून यूटर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टीमार्गे पुढे जातील व येतील.

  गोपाळ टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.

  गोपाळ टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.

  गोपाळ टी, कोकणवाडी, क्रांतीनगरमार्गे पुढे जातील व येतील.

  प्रोझोन मॉल, एन-१ चौक, वोक्हार्टमार्गे येतील व जातील.