वाहतूक कोंडी सूटत नाही नवनव्या स्कीम घेऊन घेतात, स्कीम नाही हे पॉकेटमनीसाठी स्कॅम

    कल्याण : कल्याण शीळ रस्त्यावर हाेत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. तासंतास गरोदर महिला, रुग्ण, वयोवृद्ध वाहतूक कोंडीत अडकून राहतात. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दररोज नव्या स्कीम आणल्या जातात. त्या स्कीम नसून पॉकेट मनीकरीता आणलेला स्कॅम आहे असा थेट निशाणा आमदारांनी साधला आहे. पुन्हा एकदा मनसेने खासदारांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात राजकीय वातावरण तापले आहे.

    लोकसभा निवडणूक जशीजशी जवळ येत आहे. राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसात आपल्या मतदार संघात विकास कामांच्या पाहणीचा धडाका लावला आहे. इतकेच नाही तर पक्षातील अंतर्गत बैठका सुरु आहेत. मात्र काही समस्यांबाबत अजूनही निराकरण हाेताना दिसत नाही. त्यापैकी एक समस्या आहे ती म्हणजे कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी. यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले आहेत. अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.

    कल्याण शीळ रस्त्यावरील होत असलेल्या वाहतूूक कोंडीनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. या आधी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि खासदार यांच्यावर टिका करतात. मात्र यावेळेस केलेल्या ट्वीटमध्ये अतिशय संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

    काय आहे ट्विट : 

    शीळफाट्याच्या वाहतूक कोंडीने स्वत:चेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत. वाहतूक कोंडी सुटावी यासाठी रोज नव्या नव्या स्कीम येतात. त्या स्कीम नसतातच पॉकेट मनीसाठी केलेला स्कॅम असतो अशा चर्चा ठेकेदार वर्गात सुरु आहेत. गरोदर बायका, वृद्ध, रुग्ण सगळेच तासंतास ट्राफिकला समाोरे जात आहेत. तेही आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात ? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या ? कधी तरी आमच्या सुचनांचा विचार करा. कदाचित वाहतूक कोंडी कमी होईल. पहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या. एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शीळफाट्याच्या ट्राफिक जामचा शिक्का तेव्हढा पूसा असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे पोलिसांना केले आहे.