mahad traffic

जत शहरातील मुख्य बाजारपेठ असो अथवा शहरातून जाणारे महामार्ग, शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक परिसरामध्ये बेशिस्त वाहन चालकांकडून आपली वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क केली जातात. यामुळे पादचारी व सुज्ञ वाहन चालकांना वाहतूक कोंडी या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  जत : जत शहरातील मुख्य बाजारपेठ असो अथवा शहरातून जाणारे महामार्ग, शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक परिसरामध्ये बेशिस्त वाहन चालकांकडून आपली वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क केली जातात. यामुळे पादचारी व सुज्ञ वाहन चालकांना वाहतूक कोंडी या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  शहरात कुठेही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागल्यास त्याचे खापर वाहतूक पोलिसांवर फोडले जाते. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक पोलिसांवर ताण पडत आहे. कमी यंत्रणा असून देखील वाहतूक पोलीस आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असल्याचे दिसून येते. वाहन चालकांनीच वाहतुकीचे नियम लक्षात घेऊन अस्ता-व्यस्त पद्धतीने आपली वाहने पार्क न करता वाहतूक नियमांचे पालन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही.

  भाजी विक्रेत्यांकडून उल्लंघन
  जत बाजारपेठेतील दुकान चालक व भाजीविक्रेत्यांना शिस्त लागावी, यासाठी जत नगरपरिषदेने बाजारपेठेतील प्रमुख मार्गावर दीड लाखापेक्षा अधिक निधी खर्च करून पांढरे पट्टे ओढले होते. भाजीविक्रेतांना त्या पांढऱ्या पट्ट्यांच्या आतमध्ये बसण्यास सांगितले होते. परंतु भाजी विक्रेते त्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा उद्भवू लागली आहे. भाजी विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

  जत शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच आहे. जत पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. परंतु वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत आहे. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई देखील केली जात आहे.

  - राजेश रामघरे, पोलीस निरीक्षक जत.