traffic jam on mumbai pune expressway

सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे मुंबईतील (Mumbai) पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आता गर्दीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहनांची (Traffic Jam On Mumbai Pune Expressway) सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली आहे.

    पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) वाहतूक कोंडी (Traffic Jam On Mumbai Pune Expresway) झाली आहे. वीकेंड असल्याने एक्स्प्रेस वेवर बोरघाटाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहने ही संथगतीने पुढे सरकत आहेत. वाहनांची रांग लागल्यामुळे चालकांसह प्रवासी देखील कंटाळले आहेत.

    शनिवार, रविवार सुट्टी आणि सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी जोडून आली आहे. सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे मुंबईतील पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आता गर्दीचा सामना करावा लागत आहे.

    एक्स्प्रेस मार्गावर आज सकाळी टेम्पोचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे गाडी बंद पडली, यामुळे टेम्पोच्या मागे असलेल्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. त्यातच वीकेंड असल्यामुळे मुंबईवरुन पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वर इथे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक्स्प्रेसवेवर वाहनांचा लोड पाहायला मिळतो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली आहे.