पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam on Palakhi Route) झाली होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सासवडहून जेजुरीकडे रविवारी झाले. या कालावधीत अनेक लहान-मोठी वाहने सकाळपासून ते दुपारी बारापर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती.

    सासवड : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam on Palakhi Route) झाली होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सासवडहून जेजुरीकडे रविवारी झाले. या कालावधीत अनेक लहान-मोठी वाहने सकाळपासून ते दुपारी बारापर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती.

    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत अनेक दिंड्या सहभागी होतात. या दिंड्याच्या समवेत अनेक ट्रक असतात. हे ट्रक सकाळपासून लाईन लावून मार्गस्थ झाले होते. परंतु, जेजुरीकडे जाणारी इतर वाहतूक थांबवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यामुळे सासवडसह अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती.

    वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज होती. परंतु, वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी वर्गाला आपली दुध दुभते घालण्यासाठी देखील रस्ता क्रॉस करता येते नव्हता. यंदा वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याचे दिसून येत होते.