trailer crushed them both of the killing one on the spot and seriously injuring another

अकोला बाजार येथून तुळजापूर नागपूर बायपासवरील वाघामाय येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक पिबी ०६ व्हीं ९६७१ च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

    यवतमाळ : भरधाव जात असलेल्या ट्रेलरने दुचाकीस्वार दोघांना चिरडले यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. अपघाताची ही घटना २० जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर बायपास वरील गोधनी फाट्यावर घडली. गोविंद जागोजी चिकणे (५०) असे मृतकाचे तर आणि राजू तुळशीराम धनगर (दोघेही) राहणार अकोला बाजार येथील आहे.

    मृतक व जखमी हे दोघेही आपल्या दुचाकी क्रमांक एच २९ बीटी ९९६० ने अकोला बाजार येथून तुळजापूर नागपूर बायपासवरील वाघामाय येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक पिबी ०६ व्हीं ९६७१ च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये गोविंदा चिकणे हे जागीच ठार झाले तर साथीदार राजू हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच गंभीर जखमी राजू धनकर याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले.