train service problem

आंबिवली ते टिटवाळा (Ambivali To Titwala Train) दरम्यान सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली म्हैस आल्याने टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प (Train Service Interrupted) झाली होती.

    टिटवाळा : मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली ते टिटवाळा (Ambivali To Titwala Train) दरम्यान सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली म्हैस आल्याने टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प (Train Service Interrupted) झाली होती.

    घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरात म्हैस रुळावरून बाहेर काढली. पावणे सहा वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    संध्याकाळी गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आसनगाव लोकलखाली तीन म्हशी आल्या. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक म्हैस जिवंत आहे. संध्याकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुमारे तासाभरात रुळांवरील म्हशींचे मृतदेह हटवत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अपघातामुळे आसनगाव रेल्वे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेवरील वाहतूक खोळांबली आहे. सुमारे ४० मिनिटांपासून ही लोकल जागीच खोळंबली आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.