मुंबईची सोन्याची कोंबडी कापायची आहे, मुंबईला कंगाल करायचंय. गुरुही अंधच, BMC एफडीवरुन उद्धव ठाकरेंचं मोदींवर शरसंधान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा शिंदे गटात ये, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या कदाचित बातमी येण्याची शक्यता आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटात गेले.

    मुंबई – तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी पाच-दहा मिनिटंच बोलणार आहे गद्दार विकले जाऊ शकतात. ते खोक्यांनी विकले किंवा घेता येऊ शकतात. पण जे आहे ते विकलं किंवा विकत घेता येऊ शकत नाही. संजय राऊत त्यांचे अनुभव सांगत होते. त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण सांगितली. मलाही येतायेता एक माहिती सापडली. नेत्याला एखादी माहिती पडते आणि पक्षप्रमुखाला पडत नाही असं थोडीना होतं? संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला, मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा शिंदे गटात ये, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या कदाचित बातमी येण्याची शक्यता आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटात गेले.

    दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र
    “आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती असी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    बाळासाहेबांच्या तैलचित्रामागचा हेतू वाईट
    मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे. घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे.

    काल त्याच शरद पवारांचं कौतुक केलं
    इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे. जसं नेताजींच्या मुलीने सांगितलं, शताब्दी जरुर साजरी करा. पण त्यांचे विचार मान्य आहे का? त्या बोलल्या आहेत की, सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार आहे.

    अमेरिकेचे अध्यक्ष भाजपच्या वाटेवर…

    उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दार विकले जाऊ शकतात. ते विकत घेता येऊ शकतात. मात्र, इथे जमलेले विकणे जाणे शक्य नाही. विकत घेता येणे शक्य नाही. संजय राऊत अनुभव सांगत होते. त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण सांगितली. मलाही येता येता एक माहिती कळली. मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. ते काळजीत होते. मला म्हणाले मुद्दामहून इथे आलो आहे. ते म्हणाले उद्या भाजपमध्ये चाललोय. त्यांच्या घरावर एफबीआयने रेड टाकल्याची बातमी वाचली. त्यांना काही कागदपत्रे सापडली. त्यामुळेच उद्या अमेरिकेचे अध्यक्ष मिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्याची बातमी येईल, असा टोला त्यांनी हाणला.

    मुंबई लुटू देणार नाही
    उद्योग पळवले, आर्थिक केंद्र तिकडे नेले. आता त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायचीय. मात्र, काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेला मेट्रो उदघाटन कार्यक्रम आणि भाषणाला जोरदार प्रत्युत्त दिले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.

    मुंबईच्या FDवर केंद्र सरकारचा डल्ला
    बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असं मोदी म्हणाले ते भयंकर आहे. FD म्हणजे काय? ते मुंबई महापालिकेचे हजारो कोटी आहेत ते कुणी दिले? तेव्हाचे जे लोकप्रतिनिधी, आयुक्त यांनी जी मेहनत केली त्यामुळे या ठेवी झाल्या आहेत. पण यांचा डाव हाच आहे. गुजरातमध्ये प्रकल्प पळवायचे, फिल्मसिटी पळवायची.जनतेच्या पैशांवर डल्ला मारायचा. आपण जो कोस्टल रोड करत आहोत तो टोलमुक्त असणार आहे. नागरिकांना टोल लागणार नाही. सरकार जे करणार आहे त्यावर टोल लागणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईला भिकेला लावायचं, कंगाल करायचं हा डाव आहे. यांची वाईट नजर मुंबईवर पडली आहे. ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे ती आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही. ही कसली बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेणारी माणसं? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.