
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहायक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक विभागासाठी दोन सहायक आयुक्त देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. 3) रात्री पोलीस आयुक्तांनी दिले.
या पोलीस आयुक्तांची केली नेमणूक
सहायक पोलीस आयुक्त भास्कर डेरे यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांची नेमणूक वाहतूक शाखेत करण्यात आलीआहे. त्यांच्यासोबत पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांचीदेखील वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे नेमणूक झालीआहे.
भोसरी एमआयडीसी विभागाची जबाबदारी
पदोन्नती झाल्यानंतर नव्याने शहरात दाखल झालेले मुकुट लाल पाटील यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदाचीजबाबदारी देण्यात आली आहे, तर सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.