पालखी विसावा परिसराचा कायापालटपूर्वीपेक्षा बनला स्वच्छ, सुंदर व आकर्षित

दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात संत तुकाराम महाराज यांची पालखीचा विसावा आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वीच ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसर व पालखी विसावा स्थळाचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षित करण्यात आला आहे.

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात संत तुकाराम महाराज यांची पालखीचा विसावा आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वीच ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसर व पालखी विसावा स्थळाचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षित करण्यात आला आहे.

    केकाण यांच्याकडून फरशीचे काम मार्गी

    राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण यांनी मंदिर परिसर व पालखी विसावा या ठिकाणी मार्बल, कोटा व ग्रॅनाईट या प्रकाराची १२० ब्रास फरशी बसवून नूतनीकरण केले आहे. पालखीच्या आगमनाचा पूर्वीच या ठिकाणी हे काम मार्गी लागले आहे. यापूर्वी मंदिराच्या परिसरात साधी शहाबादी फरशी बसविण्यात आली होती.

    मात्र, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकान यांनी सामाजिक कामात हातभार लावत पुढाकार घेऊन मंदिर परिसरात नवीन फरशी बसवून हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांना दिले. त्यानुसार नागेश्वर मंदिर परिसरात नूतन फरशी बसवण्याचे काम सुरू होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमनापूर्वीच हे काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

    शुशोभिकरणामुळे मंदिर परिसर आकर्षक

    ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात परिसरात संत तुकाराम महाराज पालखीचा विसावा आहे तब्बल दोन ते अडीच तास या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखीचा विसावा असतो. त्यामुळे या ठिकाणी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, काष्टी तसेच शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा व आसपासच्या गावातील तसेच दौंड शहर व पूर्व भागातील नागरिक या ठिकाणी पालखीच्या दर्शनांसाठी येत असतात.