मुलं चोरणाऱ्या टोळीत असल्याच्या संशयातून तृतीयपंथीयाला मारहाण

मुले चोरणारी करणाऱ्या टोळीतील महिला असल्याचं समजून या तृतीयपंथियाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तिच्यावर जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.

    बुलडाणा : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून काही साधूंना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता विदर्भातून एक अशीच बातमी समोर आली आहे. m असल्याच्या संशयातून जमावाने एका तृतीयपंथीयाला मारहाण केल्याची घटना बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये घडली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

    अकोल्यातील अकोट येथे काल तृतीयपंथीयांचा फॅशन शो आयोजीत करण्यात आला होता. हा फॅशन शो बघून मलकापूरकडे परत येणाऱ्या एका तृतीयपंथियाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. जुना बस स्टँड परिसरात ही घटना घडली. मुले चोरणारी करणाऱ्या टोळीतील महिला असल्याचं समजून या तृतीयपंथियाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तिच्यावर जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.