संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'ईडी'कडून चौकशी होत आहे. परंतु, राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनी भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी तृतीयपंथीयांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘ईडी’कडून चौकशी होत आहे. परंतु, राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनी भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी तृतीयपंथीयांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणारे हे तृतीयपंथी प्रथम ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार होते. मात्र, त्यांनी अचानक आपला मोर्चा भाजप प्रदेश कार्यालयाकडे वळविला. यायला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यालयात उपस्थित होते. परंतु, अचानक आलेल्या या मोर्चामुळे त्यांची तारांबळ उडाली.

    चंद्रकांत पाटील हे भाजप कार्यालयात असल्याचे कळताच तृतीयपंथी मोर्चेकरांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनादरम्यान तृतीयपंथीयांनी राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला.