Transport of foreign liquor in cars thousands of items seized in Fraserpura police operation

२ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्यातील डीबी पथक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांनी गुप्त माहितीवरून अमरावती ते मालखेड रोड (Amravati to Malkhed Road) वरील छत्री तलावाच्या पुलावर नाकाबंदी करून एका पांढऱ्या रंगाच्या मारुती कारची तपासणी केली. कार क्रमांक एमएच २७ एच ५४१९ मध्ये अवैध दारूची वाहतूक (Illegal Liquor Traffic) होत असल्याचे आढळून आले.

    अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी (Fraserpura Police) पेट्रोलिंग दरम्यान एका कारमधून विदेशी दारूची वाहतूक (Transport of foreign liquor) करणाऱ्यांना पकडले. पोलिसांनी कार चालक विजय ऊर्फ गोलू कृष्णकुमार जैस्वाल (४२, रा. मालखेड रेल्वे) याला ताब्यात घेऊन, त्याच्या ताब्यातून ८ हजार ६४० रूपये किमंतीची विदेशी दारू व मारुती झेन कार असा एकूण ६८ हजार ६४० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरूद्ध कलम ६५ ई महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअन्वये (Maharashtra Liquor Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    २ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्यातील डीबी पथक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांनी गुप्त माहितीवरून अमरावती ते मालखेड रोड (Amravati to Malkhed Road) वरील छत्री तलावाच्या पुलावर नाकाबंदी करून एका पांढरी रंगाची मारुती कारची तपासणी केली. कार क्रमांक एमएच २७ एच ५४१९ मध्ये अवैध दारूची वाहतूक (Illegal Liquor Traffic) होत असल्याचे आढळून आले. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, पोलीस हवालदार योगेश श्रीवास, हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, धनराज ठाकूर व अनुप झगडे यांच्या पथकाने केली आहे.