traffic jam on mumbai pune expressway

मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

    पुणे : दररोज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र जर तुम्ही मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन  (Mumbai – Pune Expressway) प्रवास करणार असाल तर थांबा, आणि ही बातमी वाचा. कारण ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यामुळं तुमचा वेळ आणि मनस्ताप वाचेल. मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. (Traveling on Pune-Mumbai Expressway? Then read ‘this’ news… where is the 2 hour block)

    पर्यायी मार्ग कोणता?

    दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु राहणार आहे. शिंग्रोबा घाटातील वाहतूक तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वाहतूक करता येणार आहे. परंतू दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित…

    ब्लॉकदरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.  ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km 45 व km 45/800 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे.