
परळीचे काँग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी महसूल कार्यलय गाठून समस्यांचा पाढा वाचला. आणि अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. मात्र वारंवार तक्रारी करुनही कर्मचारी अधिकारी लक्ष देत नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
बीड : महसूल प्रशासन काम करत असताना पक्षपाती करत असल्याचा आरोप करत परळीचे काँग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई (Bahadur Bhai) यांनी महसूल कार्यालयात राडा केला. आज त्यांनी थेट तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार रूपनर यांच्या अंगावर बेशरमाची फांदी फेकून निषेध केला. या प्रकरणी 18 जणांवर शासकीय कामात अडथळा म्हणून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीचे काँग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी महसूल कार्यलय गाठून समस्यांचा पाढा वाचला. आणि अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. मात्र वारंवार तक्रारी करुनही कर्मचारी अधिकारी लक्ष देत नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान बहादुर भाई यांनी महसूलचे अधिकारी पक्षपातीपणा करतात असा आरोप केला. यावेळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात बेशरमाची फांद्या फेकत निषेध केला. या प्रकरणी आता काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.