अयोध्येत राममंदिसाठी बलिदान करणारांना मिलिंद नार्वेकरांची व्टिट करत श्रध्दांजली!

बाबरी मशीद पाडण्यात आली होती त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विध्वसांची जबाबदारी स्विकारली होती.

    मुंबई, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यानी सहा डिसेंबरच्या आजच्या दिवशी राममंदीर आंदोलनात बाबरी मशीदीचा विध्वंस करत राम मंदीरासाठी अनेकांनी बलिदान दिल्याची आठवण करत श्रध्दांजलीचे व्टिट केले आहे.  अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असे या ट्वीटमध्ये नार्वेकर यांनी म्हटले आहे.

    या व्टिटवरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी सिम्बॉयसिसच्या कार्यक्रमात नार्वेकरांचे व्टिट योग्य असल्याचे म्हटले मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नार्वेकर म्हणजे सध्याचे शिवसेनाप्रमुख का? असा सवाल करत राजकीय चिमटा काढला आहे.

    हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना अजूनही कायम
    बाबरी मशीद पाडण्यात आली होती त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विध्वसांची जबाबदारी स्विकारली होती. हा संदर्भ ताजा करण्याचा प्रयत्न करत शिवसेना सचिब मिलिंद नार्वेकरांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना अजूनही कायम असल्याचे सूचक विधान व्टिट मधून केले आहे. सध्या भाजपची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचेवळी राम मंदिर निर्माणकार्य सुरु आहे, त्यामुळे निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर एकट्या भाजपचे हे श्रेय नसल्याचे आणि शिवसेनेचा बरोबरीचा वाटा असल्याचे नार्वेकर यांच्या व्टिटमधून सूचविण्यात आले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याच मुद्यावर अयोध्दा दौरा केला होता. त्यामुळे शिवसेनेचे या विषयावरील योगदान विसरुन चालणार नाही, असा सूचक इशारा मिलिंद नार्वेकरांनी दिल्याचे मानले जात आहे.

    नार्वेकर म्हणजे, आत्ताचे शिवसेनाप्रमुख का
    मात्र आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेत अभिवादन कार्यक्रमात उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नार्वेकरांच्या व्टिटचे समर्थन करताच तेथे उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांना थांबवत “नार्वेकर म्हणजे, आत्ताचे शिवसेनाप्रमुख का?”, अशी विचारणा केली. राणेंच्या प्रश्नावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.