क्रांतिवीर शाळेत रेखाटली तिरंगा व ७५ अंकाची विद्यार्थी साखळी

क्रांतीवीर शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून अमृत महोत्सवी ७५ या अंकाची प्रतिकृती आकर्षक रित्या साकारण्यात आली. या निमित्ताने रांगोळी व विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून आकर्षकरित्या तिरंग्याची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली.

    म्हसवड : क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून अमृत महोत्सवी ७५ या अंकाची प्रतिकृती आकर्षक रित्या साकारण्यात आली.

    दरम्यान या निमित्ताने रांगोळी व विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून आकर्षकरित्या तिरंग्याची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली. देशभक्तीपर गीत गायन व इतर उपक्रमाच्या माध्यमातून संस्कृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कामी क्रीडाशिक्षक तुकाराम घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांचेअभिनंदन केले.