
महाबळेश्वर वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वन विभागाचे अधीकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाबळेश्वर : महाबळेश्वर वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वन विभागाचे अधीकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, मुसळधार पावसात देखील मोठा उत्साह पाहण्यास मिळाला. ही रॅली वन विभागाच्या कार्यालयापासून मुख्य बाजारपेठ मार्गे बस स्थानक अशी मार्गस्त झाली.
दरम्यान यावेळी वनपाल सहदेव भिसे, एस व्ही गुरव, वनरक्षक रमेश गडदे, लहू राऊत, तानाजी केळगने, रोहित लोहार, अभिनंदन सावंत, मीरा कुट्टे, विलास वाघमारे, बजरंग वाडकर, विश्वमंभर माळझरकर यांच्यासोबतचं संयुक्त वन व्यवस्थापण समितीचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.