सूरतमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी पकडलं – आमदार कैलास पाटील

शिंदेंच्या गटातून बाहेर पडून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख (Kailash patil and Nitin Deshmukh Press conference) यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. आम्हांला सुरतला फसवूण नेले. विधान परिषद मतदानाच्या रात्री माझ्यासह अनेक आमदारांना ठाण्याच्या महापौर (Thane mayor) बंगल्यावर नेलं. साहेब पुढे आहेत, पुढे वसई-विरार (Vasai Virar) गेलो मला या रस्त्यांची माहिती नव्हती. आम्हाला फसवूण नेल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर त्यांच्या गटातून आलेले आमदार कैलास पाटील व आमदार नितीन देशमुख यांनी सर्व या कहाणीचा पाढा या आमदरांना वाचला.

    दरम्यान, शिंदेंच्या गटातून बाहेर पडून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख (Kailash patil and Nitin Deshmukh Press conference) यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. आम्हांला सुरतला फसवूण नेले. विधान परिषद मतदानाच्या रात्री माझ्यासह अनेक आमदारांना ठाण्याच्या महापौर (Thane mayor) बंगल्यावर नेलं. साहेब पुढे आहेत, पुढे वसई-विरार (Vasai Virar) गेलो मला या रस्त्यांची माहिती नव्हती. नाकाबंदीदरम्यान त्यांना सुखरूप सुटायचं होतं. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला कुठेतरी चुकीच्या दिशेने घेऊन जातायत असं वाटू लागलं. सरकारविरोधात नक्कीच काहीतरी कारस्थान शिजतंय याची जाणीव झाली.

    मग मी संधीचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. एका युपीच्या चालकाने त्याच्या ट्रकमधून दहिसर (dahisar chechk post) चेकपोस्टपर्यंत पोहोचण्याची तयारी दर्शवली. तिथून पुढे मला उद्धव ठाकरेंनी गाडी पाठवली. ती गाडी येईपर्यंत चालक माझ्यासोबत थांबून राहिला. त्याने मला देवाप्रमाणे मदत केली. आम्हाला तिकडे जबरदस्तीनं घेऊन गेले असल्याची माहिती या दोन आमदारांनी कैलाश पाटील व नितीन देशमुखांनी (Kailash patil and nitin deshmukh) दिली आहे.